[Video] प्रेम म्हणजे काय रे भाऊ ?

prem-mhanje-kay-ast-re-bhau-video

प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला सर्वजण प्रेम दिवस का साजरा करायचा याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. हिर-रांजा, लैला-मजनु, संत वेलेंटाईन यांचे मेसेजेस एव्हाना सोशल मीडियावर फिरु लागले आहेत. युट्यूवरील 'माय बोली' या चॅनेलने तरुणांच्या मनात प्रेमाबद्दल नेमकी कोणती भावना आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय.प्रेम म्हणजे काय? त्याबद्दल लोक काय विचार करतात हे जाणून घेत त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. सध्या हा व्हिडिओ खुपच वायरल झालेले दिसतात.



गुरुप्रसाद जाधव आणि सिद्धेश सावंत या  दोन तरुणांनी मायबोली या युट्युब चॅनलसाठी प्रेम दिवसानिमीत्त तरुण-तरुणींच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न केलाय. प्रेम म्हणजे फिरण, प्रेम म्हणजे गप्पा, प्रेम म्हणजे भांडण..माझं प्रेम ते तुमच्यासाठी लफडं,.. तुमचं प्रेम ते माझ्यासाठी जुगाड.. प्रेमाच्या व्याख्या चष्म्याचा नंबर बदलतो तशा सोयिस्कर बदलतात अशी वेगवेगळी काही अनपेक्षित उत्तरे त्यांना यानिमित्ताने मिळाली आहेत.
[Video] प्रेम म्हणजे काय रे भाऊ ? [Video] प्रेम म्हणजे काय रे भाऊ ? Reviewed by Tushar Bhambare on 09:03 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.